कोल्हापूर – कर्नाटकातील बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधून खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक केला. यावेळी शिवनामाचा गजर करण्यात आला. काही महिन्यांपूर्वी बेंगळुरू येथील सदाशिवनगर परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती.
शिवजयंतीचे औचित्य साधून खासदार कोल्हे व इतरांनी त्याच ठिकाणी शिवजयंती साजरा केली. “छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणांनी सारा परिसर दुमदुमला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते.