शिवजयंती 2021 : प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘जयघोष’

जिल्हा परिषदेकडून साध्या पद्धतीने शिवजयंतीे साजरी; सोशल डिस्टन्सिंगचे पालन

सातारा – “छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी’च्या जयघोषात किल्ले प्रतापगडावर शिवजयंती उत्साहात, पण साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. करोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. जिल्हा परिषद प्रशासनाच्या नेटक्‍या नियोजनामुळे सर्व विधी भक्‍तिभावाने पार पडले.

प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथे शिवजयंतीनिमित्त दरवर्षी जिल्हा परिषदेच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी करोनाच्या सावटामुळे शिवजयंती साध्या पद्धतीने व कमी लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा निर्णय झाला होता.

दरवर्षी शिवजयंतीला प्रतापगडावर होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विविध सभा यंदा महाबळेश्‍वर पंचायत समितीत घेण्याचा निर्णय झाला. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव व सहकाऱ्यांनी गडावर गर्दी जास्त होऊ नये, असे नियोजन केले होते. प्रतापगडावर सकाळी 7.15 वाजता भवानीमातेस अध्यक्ष उदय कबुले व मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.

त्यानंतर 8.15 वाजता भवानीमातेची महापूजा उदय कबुले, विनय गौडा, शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी समिती सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. सोनाली पोळ, समाजकल्याण समिती सभापती सौ. कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे, मनोज ससे, लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत यांच्या उपस्थितीत झाली.

त्यानंतर भवानीमाता मंदिरासमोर कुंभरोशीच्या सरपंच कांचन सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनतर साध्या पद्धतीने पालखी मिरवणूक झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने प्रतापगड दुमदुमून गेला होता. पालखी मिरवणुकीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन व ध्वजारोहण कबुले यांच्या हस्ते झाले.

जिल्हा परिषद पदाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, पाणीपुरवठा अधिकारी सुनील शिंदे, कृषी विकास अधिकारी विनायक पवार, कार्यकारी अभियंता अभय पेशवे, एन. डी. भोसले, सातारा पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर, भीमराव पाटील, अरुण गोरे, सागर शिवदास, शिवाजी सर्वगौड उपस्थित होते. करोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून जिल्हा परिषद, महाबळेश्‍वर पंचायत समिती, प्रतापगड ग्रामस्थांच्यावतीने उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

फोटो – प्रतापगड शिवजयंती नावाने सेव्ह
प्रतापगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करताना उदय कबुले, विनय गौडा, मानसिंगराव जगदाळे, मंगेश धुमाळ व इतर.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.