“शिवभोजन थाळी’ आता अवघ्या 5 रुपयांत – छगन भुजबळ

पुढील तीन महिने दररोज 1 लाख लोकांना मिळणार लाभ

नाशिक- करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्य नागरिक व मजुरांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी “शिवभोजन थाळी’ योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. पुढच्या तीन महिन्यांसाठी “शिवभोजन थाळी’ 10 रुपयांऐवजी 5 रुपयांमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला असून आता दररोज 1 लाख लोकांना शिवभोजन थाळी मिळणार आहे. या योजनेची वेळही वाढवण्यात आली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत ही शिवभोजन थाळी मिळणार आहे. मागच्या तुलनेत तब्बल 5 पट जनतेपर्यंत शिवभोजन थाळी आता पोहोचणार आहे. गरजेनुसार काही ठिकाणी शिवभोजन थाळीचं पार्सलदेखील दिल जाणार आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले. यासाठी सरकारने 160 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

दरम्यान, करोनाच्या पार्श्‍वभूमीवर “शिवभोजन थाळी’ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र गरजूंची होणारी गैरसोय लक्षात घेत “शिवभोजन थाळी’ पुन्हा सुरु करण्यात आली आहे. तसेच शिवभोजन तयार करणाऱ्या व्यक्‍तींनी नियमांच्या अधीन राहून स्वच्छता ठेवत जेवण तयार करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.