शितळादेवीचा चांदीचा मुकुट, दानपेटी पळवली

पिंपरीतील मंदिरात चोरी ः दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

चोरटे सीसीटीव्हीत कैद
चोरट्यांनी मंदिरात केलेल्या चोरीचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. सुरवातीला दुचाकीवर आलेल्या दोन्ही चोरट्यांनी मंदिर परिसराची टेहळणी केली. त्यानंतर दुचाकीवरील एकाने मंदिरात जावून देवीचा मुकुट आणि दान पेटी बाहेर आणली. त्यानंतर दोन्ही चोरटे दुचाकीवरुन पसार झाले.

पिंपरी – पिंपरीगावातील शितळादेवीचा चांदीचा मुकुट आणि दानपेटी अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. हा प्रकार सोमवार दि. 15 जुलै रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी, रोहन नंदकुमार हराळे (वय-20, रा. पिंपरी गाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी गावामध्ये शितळादेवीचे मंदिर आहे.

रविवार दि. 14 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास दोन चोरट्यांनी दुचाकीवरुन येवून शितळादेवी मंदिराचा कडी-कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला व देवीचा 15 हजार रुपये किंमतीचा चांदीचा मुकुट व 200 रुपये किंमतीची लाकडी दान पेटी चोरुन पोबारा केला. सोमवार दि. 15 जुलै रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मंदिर उघडल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.