“लागिरं झालं जी’मधील शीतली अजून पब्लिकच्या विस्मरणात गेली नाही. तोच तिचा आणखी एक शो छोट्या पडद्यावर येणार आहे. “लागिरं…’मधील शीतल उर्फ शिवानी बावकर आता “आलटी पालटी सुमडीत कलटी’मध्ये चक्क चोरटी दिसणार आहे. तिच्याबरोबर “फुलपाखरू’मधील चेतन वडनेरे असणार आहे. हे दोघेजण मिळून चोरचोरीचा खेळ मांडणार आहेत. धम्माल कॉमेडीचा तडका असलेली ही सिरीयल म्हणजे “बंटी और बबली’चा मऱ्हाठी टिव्ही अविष्कार असणार आहे. अनामिका, देवयानी आणि सुंदर माझं घर यासारख्या सिरीयलमधूनही शिवानीने काम केले आहे.