शिरवळ सासनकाठीचे तुळजापूरकडे प्रस्थान

 150 ते 200 नागरिक वारीत सहभागी

शिरवळ –
शिरवळ (ता. खंडाळा) येथील ग्रामदेवता, पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान व नवसाला पावणारी देवी अशी सर्वदूर ख्याती असलेल्या अंबिका मातेच्या शिरवळ ते तुळजापूर पायी सासनकाठीचे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले.

अंबिका मातेच्या शिरवळ ते तुळजापूर पायी सासन काठीचे मानकरी श्रीमंत शिवाजीराजे निगडे-देशमुख यांच्या हस्ते परंपरेनुसार रात्री पूजा झाली त्यानंतर देवीची मूर्ती सेसनावर स्थापना करून देवालयापासून मिरवणूक काढण्यात आली. काल श्रीमंत निगडे -देशमुख यांच्या घराण्याच्या भोगी झाल्या. तसेच ग्रामस्थ व भक्तांचे नेवैद्य, ओटी भरणे आदी कार्यक्रम झाले.

बाजारपेठेतील मुख्य रस्त्याने ढोल लेझीमच्या तालावर, हालगी नृत्य, संबळ वाजवित, तुतारीच्या जयघोषात हजारो भक्तांच्या उपस्थितीत ही सासनकाठी वाजत गाजत माहेरी तुळजापूरला जाण्यास निघाली. खंडोबाच्या पादूकांना, मंडाई व कोंडाई देवीस प्रदक्षणा घालून तिचे प्रस्थान झाले. सासनकाठीबरोबर पंचक्रोशीतील पिसाळवाडी, नायगांव, विंग, शिंदेवाडी, गुठाळे, यासह विविध गावचे सुमारे 150 ते 200 नागरिक पायी वारीत सहभागी झाले आहेत. त्यांना काटकरी म्हणतात. सासनकाठीस भक्तिभावाने निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.