शिरूर विधानसभा मतदार संघामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर

शिरूर – शिरूर विधानसभा मतदार संघामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 21 सप्टेंबर 2019 पासून आचारसंहिता चालू झाली आहे तर 21 ऑक्टोबर 2019रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती शिरूर विधानसभेचे निवडणूक अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निवडणूक काळामध्ये आचारसंहितेचे कडेकोट पालन प्रत्येक उमेदवार यांनी करावे आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या वर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी सांगितले. शिरूर विधानसभा मतदार संघासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार लैला शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे हर्षद तावरे उपस्थित होते.

शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी 31 ऑगस्ट 2019 अखेर तीन लाख 81 हजार 228 मतदान शिरूर-हवेली तालुक्यातून असून यामध्ये दोन लाख 98 हजार 969 पुरुष मतदार तर एक लाख 82 हजार 249 महिला मतदार तर दहा इतर मतदार आहेत.

या निवडणुकीसाठी शिरूर हवेली तालुक्यात करिता 376 मतदान केंद्रे बारा सहाय्यकारी मतदान केंद्र अधिक एक असे एकूण मिळून 389 मतदान केंद्र असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दहा हजार रुपये अनामत रक्कम तर अनुसूचित जाती जमाती साठी पाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.या निवडणुकीकरिता प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्च हा 28 लाख रुपये असणार आहे.

शिरूर विधानसभा 2019 साठी निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे

20 सप्टेंबर पासून अचारसहिता सुरू. 27 सप्टेंबर 2019 पासून उमेदवारी अर्ज दाखल करणे 4 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत, 5 ऑक्टोबर रोजी छाननी, सात ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत त्यानंतर दुपारी तीन वाजता चिन्ह वाटप तर मतदान 21 ऑक्टोबर रोजी व मतमोजणी 24 ऑक्‍टोबर रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.