शिरूर (प्रतिनिधी) : शिरूर जवळील बाफना मळा येथील कोरोना बाधित शिक्षकांच्या संपर्कात आल्याने त्यांचा मुलगा आणि पत्नी दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
काही दिवसापूर्वी शिरूर येथील बाफना मळा येथील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील 14 जणांना क्वांरटाईन करण्यात आले होते. तर त्यांच्या संपर्कातील त्यांची पत्नी व मुलगा या दोघांचे स्वॅबचे नमुने पुणे येथे कोरोना तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल आला असून ते दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शिरूर येथील बाफना मळा कंटेनमेंट झोन घोषित केला असला तरी नागरीक कुठलेही नियम याठिकाणी पाळत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
बाफना मळ्यात रस्ता बंद केला नाही… पोलिस फिरकत नाही… तसेच ग्रामपंचायत लक्ष देत नाही असे लक्षात आले आहे…