शिरुर – वडगाव रासाई ता. शिरूर येथे सरपंच उपसरपंच निवडीनंतर डिजे लावून, मिरवणूक गुलाल उधळून जिल्हाधिकारी, पुणे यांच्या जमाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीपुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद, नवनिर्वाचित सरपंच यांच्यासह आठ जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी संपत उर्फ नाना संभाजी फराटे यांचा जेसीबी मालक व चालक, सुरेश गुलाब शेलार यांचा बेंजो चा मालक व चालक, प्रदीप दादा कंद, ज्ञानदेव उर्फ काका जिजाबा खळदकर,सचिन बंडू शेलार, मोहन चव्हाण , वीरेंद्र शेलार, भाऊ यादव , पोपट पंढरीनाथ शेलार अशा नऊ जणांवर शिरूर पोलिस ठाण्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ब, भारतीय साथीचे रोग नियंत्रण 1897 चे कलम 2,3,4मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याप्रकरणी पोलिस कर्मचारी योगेश आनंदा गुंड यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,तरी काल दि. २४ रोजी दुपारी वडगाव रासाई ग्रामपंचायतीची सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक शांततेत पार पडली. त्यानंतर दुपारी
3 वाजुन २० मिनिटाचे सुमारास वडगांव रासाई ग्रामपचायतीची सरपंच व उप-सरपच या पदाची निवडणुक झालेनंतर समोरील असलेल्या मोकळया पंटागणात प्रदीपदादा कंद हे तेथे आले.
त्या ठिकाणी सपंत उर्फे नाना संभाजी फराटे यांचा जे.सी बी.वरील मालक व चालक व सुरेश गुलाबराव शेलार याची बॅन्जोचा मालक व चालक , प्रदीप दादा कंद , ज्ञानदेव उर्फ काका जिजायाखळदकर , सचिन बंड शेलार , मोहन चव्हाण , विरेद्र शेलार , भाउ यादव , पोपट पंढरीनाथ शेलार वरील अ.क. ३ ते ८ त जे सी बी चे बकेटमध्ये व त्या जे. सी.पी.च्या बकेट समोर ५० ते ६० अज्ञात इसम यांनी विना परवानगी डीजे लावून मिरवणुक काढुन बेकायदा मंडळी जमवून घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी , पुणे यांच्या जमाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यानुसार शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करित आहेत .