शिरूर : कवठे येमाई ता.शिरूर येथे रोहिलवाडी परिसरामध्ये गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल करत शिरूर पोलिसांनी गावठी हातभट्टी रसायनासहीत उध्वस्त केली आहे.
याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे शिरूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील कवठे येमाई गावच्या हद्दीत रोहीलवाडी, पवार वस्ती ,घोडनदी परीसरातील काटवनात इसम १) अक्षय बाळु देवकर व २) सागर गणपत गंडगुळ दोन्ही रा. कवठेयमाई ता. शिरूर हे मानवी आरोग्यास अपायकारक असणारे गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन तापवुन गाळुन त्यापासुन तयार झालेली गावठी हातभट्टीची दारू तसेच ताडी लोकांना पिण्याकरिता विक्री करत असल्याची बातमी मिळाली.
सदर ठिकाणी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, पो.हवा. भवर, पो.हवा. परशुराम सांगळे, नितिन सुद्रिक, पो. अं. निखिल रावडे, पो.अं. सचिन भोई यांनी छापा कारवाई करून एकूण १,५४,८७५/- रू. किंमतीची गावठी हातभट्टी दारू, कच्चे रसायन, ताडी व गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारी आवश्यक साहित्ये जण करून जागीच नष्ट करून छापा कारवाई करून आरोपी १) अक्षय बाळू देवकर व २) सागर गणपत गंडगुळ दोन्ही रा. कवठे येमाई ता. शिरूर यांच्याविरूध्द शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (भा.पो.से.), मा.अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर उपविभाग प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे पो.नि.संदेश केंजळे, पो.हवा. भवर, सांगळे, सुद्रिक, पो.अं.रावडे, पो.अं. सचिन भोई यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.स.ई दिलीप पवार हे करीत आहेत.
नागरीकांना शिरूर पोलिसांचे आवाहन…
शिरुर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील नागरिकांना आव्हाण करण्यात येते की, आपल्या आसपास कोणी अशा प्रकारे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी तयार करीत असल्यास त्याबाबत पो.नि. संदेश केंजळे मो.नं. ७७३८६०१९९१ यावर माहिती दयावी. माहिती देणा-याचे नाव गुपित ठेवण्यात येईल. असे आवाहन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी नागरिकांना केले आहे.