शिरूर : शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत चोरी गेलेल्या 10 मोबाईल फोनचा शिरूर पोलिसांच्या पथकाने शोध घेवुन मुळ मालकांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती शिरूर चे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.
शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील शिरूर बाजारपेठ, शिरूर बस स्थानक व शिरूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईल गहाळ झाल्याचे अर्ज पोलिस स्टेशन मध्ये दाखल झाले आहेत. गहाळ झालेले मोबाईल फोन हे ट्रेस करून पुन्हा नागरिकांना परत करण्याबाबत पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी सुचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल विजय गजानन शिंदे यांनी ट्रेसिंगला लावले. गहाळ झालेल्या मोबाईलचे तांत्रीक विश्लेषन करण्याचे काम सुरू केले. तपासाअंती चोरी गेलेल्या २,२५,०००० रूपये किंमतीच्या १० मोबाईल फोनचा शिरूर पोलिसांच्या पथकाने शोध घेवुन मुळ मालकांना परत करण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे.
याकामी गुन्हे शोध पथकामधील सहायक पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोलीस अमंलदार विजय शिंदे, पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अमंलदार निरज पिसाळ, रघुनाथ हळनोर, निखील रावडे, नितेश थोरात यांचे पोलीस पथकाने परिश्रम घेतले.
मुळ मालकांना हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे व गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले असुन शिरुर तालुक्यातील नागरीकांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे.