शिरूर : शिरूर शहरातील बायपास पुणे -नगर रस्त्यावर गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एकाला शिरूर पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने अटक केली आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे निखील भिमाजी रावडे, पोलीस कॉन्स्टेबल यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अविष्कार संजय सप्रे (वय-19 वर्षे सध्या रा. विठठल नगर, शिरूर, मुळ रा. सावेडी नागापुर एल.टी कॉलनी ता. अहमदनगर जि. अहमदनगर ) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल निखील रावडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक तरुण त्याच्या पांढ-या रंगाच्या पोलो गाडी मध्ये गावठी पिस्टल सोबत घेवुन अहमदनगर ते पुणे जाणाऱ्या रोडच्या लगत असणाऱ्या हॉटेल गंगा ग्रॅन्ड समोर थांबला आहे.
याबाबत खात्री करून रावडे यांनी सदर माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने शिरूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोलीस हवालदार परशराम सांगळे, पोलीस कॉन्स्टेबल निरज पिसाळ, विजय शिंदे, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, पवन तायडे, निखील रावडे, राजु मांगडे या तपास पथकाला सुचना देऊन त्या ठिकाणी सापळा रचून कारवाई करण्याचे आदेश दिले.
पोलीस पथकाने गंगा ग्रँड हॉटेल जवळ सापळा लावून त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तुल व त्याचे मॅगझिन मध्ये एक जिवंत काडतुस मिळुन आले असुन त्याबाबत कोणताही परवाना मिळुन आली नाही. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी,पोलीस कॉन्स्टेबल निरज पिसाळ हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोलिस हवालदार परशराम सांगळे, पोलीस कॉन्स्टेबल निरज पिसाळ, विजय शिंदे, निखील रावडे, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, पवन तायडे, राजु मांगडे यांच्या पोलीस पथकाने केली आहे.