शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर शहरातील कोविड केअर सेंटर मधून काल तपासणीसाठी पाठवलेले 26 जणांपैकी 4 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली आहे. यामध्ये शिरूर शहरातील सय्यद बाबा नगर, विठ्ठल नगर व भूमी अभिलेख कार्यालयातील रामलिंग येथील एकजण व गणेगाव खालसा येथील एक असे चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.
भुमिअभिलेख लेख कार्यालयातील एक कर्मचारी सोडून इतर कर्मचाऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. शिरूर शहरातील सय्यद बाबा नगर येथील 35 वर्षीय महिला तर विठ्ठल नगर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कोरोना बाधित महिलेच्या 42 वर्षीय पती, तर रामलिंग येथील भूमी अभिलेख मधील 53 वर्षीय पुरुष असे शिरूर शहरातील तिघं कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आता शिरूर शहरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तर गणेगाव खालसा येथील 56 वर्षीय पुरुषही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. शिरूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सय्यद बाबा नगर येथील गर्दीच्या वस्तीमधील एक 35 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने शिरुर शहराला आता सतर्क राहण्याची गरज आहे.गेल्या अनेक दिवसांपासून या 35 वर्षीय महिलेला त्रास होत असल्याने त्यांनी स्वतःहून शिरूर येथील कोविड केअर सेंटर येथे कोरोनाची तपासणी केली होती. त्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी तुषार पाटील यांनी दिली आहे.
शिरूर नगर परिषदेच्या वतीने याठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात येणार असून या गर्दीच्या ठिकाणी ठिकाणी आता भीतीचे वातावरण पसरले असून शिरूर नगर परिषद याठिकाणी आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे शिरुर नगर परिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.