Shirur Lok Sabha Constituency। संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. त्यामुळे राजकीय महासंग्राम म्हणून पाहिल्या गेलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याविषयीचा फैसला होईल. दरम्यान, महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा निकाल देखील समोर येत आहे. यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काही ठिकाणी अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात मविआचे उमेदवार अमोल कोल्हे यांना मोठ्या प्रमाणात आघाडी मिळताना दिसून येत आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना लोकसभा मतदार संघातील सर्व विधानसभा मतदारसंघात मोठं मताधिक्य मिळत आहे. त्यांना नवव्या फेरीअखेर कोल्हेंना ४४०६८ मतांची आघाडी मिळाली आहे.
दरम्यान, अमोल कोल्हे यांना मिळत असलेल्या आघाडीचा आनंद आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावती साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी आंबेगाव, शिरूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून मोठा जल्लोष पुणे नगर महामार्गावर केला आहे.