शिरूर (पुणे) : पुण्याजवळ अंधश्रद्धेचा विचित्र प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील पाबळ येथे संबंधित घटना समोर आली आहे. पाबळच्या स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. या अघोरी प्रकारामुळे संपूर्ण गाव हादरलं आहे.
पाबळ येथील स्मशानभूमीत काळी पिशवी,कोहळा भोपळा,त्याला टाचणी च्या साहाय्याने लावलेला मुलीचा फोटो आणि लिंबू इत्यादी साहित्य आढळले यातून पूर्वीचा अघोरी प्रकार समोर आला आहे.
अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार घडल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाबळमधील स्मशानभूमीमध्ये दशक्रिया विधी सुरू असताना हा प्रकार उघड झाला. हा प्रकार उघड झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.