शिरूर- तालुक्यात कोरोनाव्हायरस संसर्ग झाला असून आजपर्यंत 16रुग्ण कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून, यात सात रुग्ण बरे झाले तर सहा जणांवर उपचार सुरू आहेत . तर तिघे जणाचा यात मृत्यू झाला आहे. यातशिरूर तालुक्यातील नऊ जण असून बाहेरून आलेले सहजनांचा समावेश असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यात सात गावात हे रुग्ण आढळून आले . या सातही गावात शासन लक्ष ठेवून आहे येथील प्रत्येक हालचालीवर सर्व खात्याचे अधिकारी डोळे लावून आहेत.शिरूर तालुका चौथ्या लॉक डाऊन मध्ये ऑरेंज झोन मध्ये गेला आहे
आतापर्यंत शिरूर तालुक्यातील सनसवाडी 1, शिक्रापूर 2 ,विठ्ठलवाडी 1 तळेगाव ढमढेरे 4 , शिवतक्रार माळुंगी 2, कवठे यमाई 4, कारेगाव 1, एक सोनोग्राफी करणारेडॉक्टर असे कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले. त्यापैकी सणसवाडी एका तरुणाने, शिक्रापूर येथील एका महिलेने , विठ्ठलवाडी येथील एका चिमुकली ने, तळेगाव ढमढेरे येथील 2 पुरुष, एका महिलेने, एक डॉक्टरअसे मिळून सात जणांनी या जीव घेना कोरोना आजारावर मात करून पुन्हा आपल्या घरी परतले आहेत.
तर या कोरोना व्हायरस आजाराने तळेगाव ढमढेरे येथील एक महिला, शिक्रापूर येथील एका कामगार तरुणाचा, तर कारेगाव येथील एका वृद्ध महिला असे तिघाजनाचा यामुळे मृत्यू झाला आहे.
याबाबत शिरूर तालुक्यात अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी या जीवघेण्या करोना संसर्गामुळे त्याच्यावर मात करणाऱ्यांची संख्याही ही जास्त आहे.
तर या या अनेक रुग्णांच्या संपर्कात आलेले अनेक डॉक्टर नर्सेस नागरिक यांची अहवालही ही निगेटिव आल्याने शिरूर तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे ही शिरूर तालुक्याचे दृष्टीने जमेची बाजू असून यातील सणसवाडी येथील तरुण बाहेरगवी नोकरीला होता, चरकवठे येमाई येथील तिघेजण मुंबई वरून आली होते.