रांजणगाव गणपती(प्रतिनिधी) : पिंपळे जगताप येथील कोरोना बाधित आडत्यांच्या संर्पकांत आलेल्या गणेगाव खालसा ता. शिरुर येथील पद्मावती वस्तीवरील दोन शेतकऱ्यांना कोरोना लागण झाल्याचे रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. महेश सातव यांनी सांगितले.
तालुका वैद्यकीय अधिकारी आर .डी. शिंदे , सरपंच, तलाठी , ग्रामपंचायत प्रशासनाने संबधित ठिकाणांना भेटू देऊन रुग्णांना व कुटुंबातील सदस्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आलेले आहे व परिसर प्रतिबंधित क्षेञ म्हणून जाहिर करण्यात आलेला आहे़.
ग्रामस्थांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, कोणीही एकञ व समुहाने फिरु नये, सर्वानी तोंडाला मास्क लावावे, कोणत्याही इतर अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर आणि गणेगाव खालसाचे सरपंच दत्ताञय पिंगळे यांनी केले आहे.