तालुका प्राथमिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांची माहिती…
शिरूर (प्रतिनिधी) : शिरूर शहराजवळ असणाऱ्या बाफना मळा येथील एका 53 वर्षीय शिक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर तालुका प्राथमिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
या शिक्षकाचा मुलगा पुण्यातील एका बड्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याने संबंधित शिक्षकही त्याच्याबरोबर पंधरा दिवसापासून त्याच हॉस्पिटल मध्येच होते. काल (दिनांक 25 जून) या 53 वर्षीय शिक्षकांला त्रास होऊ लागल्याने त्यांनी खाजगी लॅब कडून कोरोना तपासणी करून घेतली होती. आज त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.
शिरूर शहराजवळ बाफना मळा येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने बाफना मळा, बाबुराव नगर आणि शिरूर शहर येथे खळबळ उडाली आहे. याबाबत तर्डोबाचिवाडी ग्रामपंचायतीला माहिती दिली आहे.