शिरुर तालुक्यात एकाच दिवशी 14 कोरोना पॉझिटिव्ह, नागरिक चिंतेत

शिरूर : शिरूर शहरातील सैनिक सोसायटी 68 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह असून,आडतबाजार येथील 56 वर्षीय व्यापारी असे शिरूर शहरा सह  तालुक्यात 14 रुग्ण कोरोना बाधित आढळले असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे व शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली आहे.

शिरूर शहरात काल आढळलेल्या रुग्णांमध्ये सिटी बोरा कॉलेज समोरील नामांकित डॉक्टर याच्या संपर्कात आलेले दोघे  कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने , प्रथमत रुग्ण निघाल्याने सरदवाडी, गावात घबराट पसरली आहे.या डॉक्टरांच्या संपर्कात अनेक रुग्णालयाची चर्चाही शिरूर तालुक्यात आहे.

शिरूर शहरातील सैनिक सोसायटी येथील वकिलाच्या संपर्कात आलेले  68 वर्षीय नातेवाईक, शहरातील आडत बाजार येथील एक व्यापारी २ , गणेगाव खालसा येथील १, रामलिंग रोड जाधव मळा १, शिक्रापूर ३, सणसवाडी १, कोरेगाव भीमा १, सरदवाडी २, करंदी २, बाभुळसर खुर्द १, असे शिरूर तालुक्यातील सात गावात आठ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शिरूर तालुक्यातील कोरोना ची साखळी रोज वाढताना दिसत आहे. शिरूर शहरात २९ रुग्ण तर शिरूर शहरासह शिरूर तालुक्यात १९६ रुग्ण झाले आहेत. शिरूर तालुक्यातील अनेक गावात आता रोजच नव्याने रुग्णांची वाढ होत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.