रांजणगाव गणपती(प्रतिनिधी) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत येणाऱ्या रांजणगाव गणपती व गणेगाव खालसा या दोन गावांमध्ये एक-एक जण कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण सापडला असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी डाँ. स्नेहल घोडेवार यांनी सांगितले.
रांजणगाव गणपती येथील रुग्ण हा आधीच्या कोरोना पाँझिटिव्ह रुग्णाच्या संर्पकातील आहे तर गणेगाव खालसा येथील रुग्णाला कोठे लागण झाली याचा शोध घेण्याचे काम चालू असून संबोधित रुग्णांच्या संर्पकातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन वैद्यकिय उपचार व होम कोरोंटाईन करण्यात येणार असल्याचे डाँ. स्नेहल घोडेवार यांनी सांगितले.