शिरूर – शिरूर शहर आता लॉक डाऊन उठला रे उठला? अशी म्हणण्याची वेळ आज शिरूर शहरात आली आहे.चारचाकी दुचाकी आणि पायी चालणाऱ्या नागरिकांनी शिरूरच्या सर्वच भागात गर्दी केली होती त्यामुळे शिरूर शहरात लॉक डाऊनलोड उठला काय असे म्हणण्याची वेळ आली आहे. नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले. त्यांनी या नागरिकांना फिरण्यास परवानगी दिली काय असा संशय वाटत होता. पुणे नगर मार्गावर मात्र मोठ्या प्रमाणात दुचाकी-चारचाकी ट्रक कंटेनर मालवाहतूक कंटेनर यांची सुरू होती जिल्हा बंदीच्या आदेशाला हरताळ फासल्याचे यामुळे दिसून येत होते .
काल महाराष्ट्र शासनाने काही भागात लोकांशी तील केला आहे त्यामुळे शहरात आज अनेक नागरिक तरुण यांनी आपल्या दुचाकी आणि चारचाकी घेऊन शहरांमध्ये फिरणस सुरुवात केली आहे.या लॉक डाऊन बाबत शहरातील नगरपरिषद पोलीस प्रशासन यांनी याबाबत कुठलीही जाहीर सूचना दिलेली नाही व कुठला नियमाबाबत सांगितलेले नाही तरी नागरिकांनी शहरात मोठ्या प्रमाणात फिरताना दिसत होते. शहरातील गल्ली बोळा तरुण ग्रुपने थांबलेले दिसत होते .
लहान मुले खुलेआम खेळताना दिसत होती कुठला सोशल डिस्टन्स याठिकाणी पाळला जात नव्हता या सोशल डिस्टन्स आणि नागरिकांचा कुठलाही संबंध नाही आणि कुठलीही कोरोणा व्हायरस संसर्गाची भीती नागरिकांमध्ये आज दिसत नव्हती. काही तळीराम शहरातील एक मेव असणारे वाईन शॉप च्या आसपास घुटमळत दिसत होते तर वाईन शॉप मालकांनी आपल्या दुकानाच्या पुढे सोशल डिस्टन्स पांढरे चौकोन असलेले दिसत होती.पेट्रोल पंपावर मोठ्याप्रमाणात पेट्रोल भरण्यासाठी सर्व नागरिकांनी गर्दी केली होती.
शिरूर एसटी स्टँड ते शिरूर पोलीस स्टेशन पर्यंत मोठ्या प्रमाणात टू व्हीलर चारचाकी गाड्या फिरताना दिसत होत्या तर पुणे-नगर शहराबाहेरून जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात गाड्यांची ये-जा दिसून येत होती. यामुळे शिरूर चारा बरोबर संपूर्ण जिल्ह्याचे लॉक डाउन उघडले का काय असे वाटत आहे.
शिरूर शहरात आज लॉक डाऊनलोड ऊघडल्याचे चित्र निर्माण झाले होते, संपूर्ण शिरूर शहरातील रस्त्यांवर दुचाकी-चारचाकी आणि फिरणाऱ्या नागरिकांनी मुळे गर्दी झाली होती. यामुळे या परिसरात सोशल डिस्टन्स कुठे दिसत नव्हते. अनेक किराणा दुकानदारांनी सोशल डिस्टन्स ला हरताळ फासला होता.