पुणे – शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्या (दि.9) शेवटचा दिवस आहे. अजूनपर्यंत प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे मंगळवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. शिरूर मतदारसंघात आतापर्यंत 9 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ आहे.