शिरूर : शिरूर शहरासह शिरूर तालुक्यात 10 गावात 25 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 649 एवढा झाला असून शिरूर तालुक्यातील आजही कोरोना बाधितांची संख्या वाढतेच आहे.
शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली , कर्डेलवाडी, भांबर्डे, या गावांमध्ये नव्याने प्रथमच कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या चिंता वाढवणारी आहे.
शिरूर शहरात भाजीबाजार येथील 62 वर्षे पुरुष, तर गुजर मळा येथे पन्नास वर्षे पुरुष, शांतीनगर येथील 50 वर्षीय महिला असे तिघेजण कोरोना बाधित आढळले आहेत.यामुळे शिरूर शहरातील कोरोना बाधितांचे आकडा 119 एवढा झाला असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली आहे.
शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा 4, शिक्रापूर 6, कारेगाव 6, मोराची चिंचोली 1, विठ्ठल वाडी 1, कर्डिले वाडी 1, भांबर्डे 1, तर्डोबावाडी 1, वडु बुद्रुक 1, शिरूर शहर 2 तसेच शिरूर तालुक्यातील 10 गावात 25 कोरोना बाधित रुग्ण आढळले तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली.
शिरुर शहरात अनेक कोरोना बाधित रुग्णांच्या परिसर प्रतिबंधित करण्यात आला परंतु तर अनेक ठिकाणी नागरिक संपूर्ण परिसर प्रतिबंध करू देत नसल्याचे दिसून आले आहे. त्यात अनेक कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांची कोरोना तपासणी आरोग्य प्रशासनाच्यावतीने झालेली नाही. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचे नातेवाईक व हाय रिस्क कॉन्टॅक्ट नागरिक शिरूर शहरात खुलेआम फिरताना दिसत आहेत.
काही कोरोनाबाधित रुग्णांच्या घरी कोरोनाबाधित रुग्ण निघाल्यानंतर एकदाच नगरपरिषद येऊन गेले. परंतु आरोग्यविभाग पुन्हा त्या कोरोना बाधित रुग्णांच्या घरी गेले नाहीत. कोरोनारुग्णाची हिस्ट्री याबाबत कुठलीही माहिती घेत नसल्याचे दिसून येत असल्याने शिरूर शहर आता मोकाट झाले का काय अशी परिस्थिती निर्माण झाली असून आरोग्य प्रशासनाने याबाबत गंभीर होणे गरजेचे आहे.