शिरूर : शहरासह शिरूर तालुक्यात आज 12 गावात 20 कोरोनाबाधित रुग्ण आढळले तालुक्यात 2 वृद्धांचा कोरोना मुळे मृत्यु झाला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली.
शिरूर शहरात ५ तर शिरूर तालुक्यात 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. यामुळे शिरूर शहरात घबराट पसरली असून 2 रुग्णांचा मृत्यू तालुक्याला चटका देणार आहे. तर शिरूर तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या रोजच वाढत आहे. यासाठी प्रशासन नक्की काय भूमिका घेत आहे हे नागरिकांना समजणे अवघड झाले असून, कोरोना बाधित रुग्णांचे नातेवाईक व हायरिक्स संपर्कात आलेले होम व क्वारंटाईन नागरिक कुठल्याही नियमाचे पालन करत नसून खुलेआम फिरत असल्याने शिरूर तालुक्यात कोरणा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात कंपनी कामगार यांच्यामुळे शिरूर तालुक्यातील डोकेदुखी वाढली आहे.
शहरातील कांचीआळी येथे 54 वर्षीय पुरुष, यशवंत कॉलनी येथील माझी नगरसेवक 41 वर्षीय पुरुष, तर कुंभार आळी येथील सलून व्यावसायिक 48 वर्षीय पुरुष, गुजरात येथील 41 वर्षीय पुरुष, भाजीबाजार येथील 33 वर्षीय तरुण असे एकूण 5 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
शिरूर तालुक्यातील धानोरी येथील 79 वर्ष वृद्ध पुरुष, सणसवाडी येथील 80 वर्षीय वृद्ध महिला या दोघांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. शिरूर तालुक्यातील शिरूर शहरात 5, अण्णापुर 1,मलठण 1, केंदुर 2, शिक्रापुर 1, पाबळ 1, आपटी 1, गणेगाव दुमालादुमाल 3, कारेगाव 2, शिरूर ग्रामीण 1,जांबुत 1, मांडवगण 1, असे शिरूर तालुक्यातील 12 गावात 20 कोरोना बाधित रुग्ण आलेले आहे.