शिरूरमध्ये दोन लाखांची रोकड भरदिवसा लांबवली

शिरुर  – शिरुर विद्याधाम प्रशालेसमोर भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी चोरट्याने गाडीच्या दरवाजाची काच फोडून डिकीतील दोन लाख रुपयांची रोकड पळविली. विलास पाचर्णे (रा. पाचर्णेमळा, तर्डोबाचीवाडी) यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

फिर्यादी पाचर्णे यांचा बांधकाम व्यवसाय आहे. मंगळवार (दि.30) फिर्यादी विलास हे कारने सकाळी अकराच्या सुमारास शिरुर येथील महानगर बॅंकेत गेले. तेथून त्यांनी 2 लाखांची रक्‍कम काढली. ही रक्‍कम कारच्या पुढील डिक्‍कीत ठेवली. तेथून कारमधून शाळेसमोर समोर आले. तिथे कार लॉक करून लोखंडे यांच्या दुकानात गेले. सकाळी पुन्हा फिर्यादी हे दुकानातून बाहेर येउन कारजवळ आले असताना कारच्या दरवाजाची काच फुटल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. तपास पोलीस हवालदार रुपनवर करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.