शिर्डी लोकसभेची मतदानयंत्रे “स्ट्रॉंग रूम’मध्ये बंदिस्त

पोलीस व सीआयएसएफचा जागता पहारा

नगर – शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानात 64.54 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात एमआयडीसीतील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सुरक्षितपणे ठेवण्यात आले. याठिकाणी पोलीस आणि केंद्रीय औद्योगिकसुरक्षा दलाचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक निरीक्षक व्ही. एस. बंकावत, अप्पर जिल्हाधिकारी पिराजी सोरमोरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार हेमा बडे आदी उपस्थित होते. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवली जावी, या ठिकाणचे सीसीटीव्ही कायम सुरू राहावेत, सध्या काम सुरु असलेल्या प्रत्येक ठिकाणी कामासाठी येणाऱ्या मजुरांची नोंद ठेवली जावी, ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये, असा सूचाना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यावेळी निवडणूक व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील व शिर्डी मतदार लोकसभा मतदार संघातील मतदान येत्रे यांना कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.