पुणे: माजी महापौर आणि कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता शैलेश टिळक यांच्या निधीतून श्री छत्रपती शिवाजी पुल आणि डेंगळे पुलाच्या विद्युत रोषणाईचे उदघाटन महापौर मुरलीधर मोहळ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह महेश करपे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
यावेळी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, राजेश येनपुरे, प्रमोद कोंढरे, अर्चना पाटल, बापू मानकर, नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.
यावेळी टिळक म्हणाल्या, ऐतिहासिक शिवाजी पुलाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. शहरातील पुलांचे सुशोभिकरण हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने हे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्यात छत्रपती शिवाजी पुल आणि डेंगळे पुलाचे काम करण्यात आले. पुण्यात पर्यटक आल्यावर त्याला शहराचे वेगळेपण दिवसावे यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे.
महापौर मोहळ म्हणाले, पुणे महापालिकेच्या भाजपच्या पहिल्या महापौर मुक्ता टिळक यांनी शहरासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. नदी सुधार, इलेक्ट्रीक बस, चोवीस तास पाणीपुरठा अशा योजना त्यांच्या महापौर पदाच्या काळात सुरु झाल्या आहेत. त्यापुर्ण करण्याचे काम आम्ही करत आहे. यावेळी करपे म्हणाले, पुण्याची ओळख आता पुलांचे शहर म्हणून बनत आहे. या सुशोभिकरणामुळे पुलांच्या सैदर्याय भर पडली आहे.