मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करताना उध्दव ठाकरेंना काटशह देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी त्यांच्या सर्व आमदार, खासदार व महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसह प्रयागराज येथे कुंभस्नान करण्याचा कार्यक्रम आयोजिला आहे. त्यानुसार १९ फेब्रुवारीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें व त्यांच्या सर्व शिलेदारांसह प्रयागराजला जाणार आहेत.
तिथले सर्व धार्मिक कार्यक्रम आटोपून साधु-संत महंतांचे आशीर्वाद शिंदे घेणार आहेत.त्यांचा हा कार्यक्रम हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या उध्दव ठाकरेंचे शह देण्यासाठी असल्याचे शिदेंसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबतची अधिक भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत नेतेमंडळी प्रभावीपणे मांडतील असेही ते सांगत आहेत.
प्रयागराजचा कार्यक्रम आधी ठरल्यानुसार दोन दिवसांचा होता.परंतु कदाचित तो आणखीन दोन दिवस वाढण्याची शक्यता पदाधिकारी वर्तवित आहेत. यावेळी हिंदुत्वार संत-महंताचे आशीर्वाद घेताना त्यांचेकडून धार्मिक अध्ययनही होईल. तसेच आमदार व खासदारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबरोबर मोकळा सवांद साधण्याचीही संधी आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार कुंभस्नान निमीत्ताने शिंदेंच्या अधिकृत शिवसेनेचे शक्तीप्रदर्शनही दिसेल व उरलेल्या उबाठा सेनेवर दबाव येईल.
या कुंभस्नाना दरम्यान सुरक्षेत कपात झाल्यामुळे नाराज झालेल्या आमदार व खसदारांची समजूत काढण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें व त्यांचे मंत्री सहज करु शकतील.तसेच मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस आल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे चित्र भासवले गेले ते खरे वा खोटे आहे याचे जवळून निरीक्षणही शिदेंसेनेच्या प्रयागला गेलेल्या पदाधिकाऱ्यांनाही करता येईल असे शिंदेसेनेचे नेते सांगत आहेत.