Maharashtra Assembly Election 2024 | महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने नुकतीच 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.
परंतु यापैकी पाच मतदारसंघ हे भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून खेचून घेतले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नालासोपारा, उरण, धुळे शहर, अचलपूर, देवळी या मतदार संघाचा समावेश होता. येथे शिवसेना वर्षानुवर्षे लढत आहे. मात्र आता या जागांवर भाजपने उमेदवार उभे केले आहेत.
- भाजपने राजन नाईक यांना नालासोपाऱ्यातून उमेदवारी जाहीर केली आहे. 2019 या मतदार संघातून शिवसेनेचे प्रदीप शर्मा उमेदवार होते.
- उरणमधून भाजपने महेळ बालदींना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघात शिवसेनेचे मनोहर भोईर हे 2019 ला उमेदवार होते.
- धुळ्यात 2019 ला शिवसनेनेचे हिलाल माळी हे धुळे शहराचे उमेदवार होते. पण या मतदारसंघातून भाजपकडून अनुप अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
- अचलपूरमधून अतुल तायडेंना भाजपने यंदा उमेदवारी दिली. याच मतदारसंघातून सुनिता फिसके या शिवसनेच्या उमेदवार होत्या.
- देवळी मतदारसंघात भाजपकडून राजेश बकानेंना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिल्यानंतर विधानसभा निवडणुकांसाठी तुम्ही त्याग करा, असं अमित शाह यांनी म्हटल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यातच आता शिवसेनेच्या पाच जागांवर भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या पाच जागांवर शिंदे गटाला माघार घ्यावी लागल्याचे दिसत आहे.
हेही वाचा:
महाविकास आघाडीचं ठरलं? ; आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची घोषणा करणार ?