Shimla Mosque । हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील संजौली परिसरातील मशिदीबाबत हिंदू संघटनांकडून सुरू असलेला विरोध थांबत नाही आहे. संजौली परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या हिंदू संघटनांच्या लोकांनी आज पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले. आंदोलक आता मशिदीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. बॅरिकेड तोडल्यानंतर पुढे जाणाऱ्या जमावावर पोलिसांनी लाठीचार्जही केला आहे.
#WATCH | Shimla Protests | Himachal Pradesh: Protestors remove the barricading and enter the Dhalli Tunnel East portal during their protest rally against the alleged illegal construction of a Mosque in the Sanjauli area pic.twitter.com/zz4nfmMgao
— ANI (@ANI) September 11, 2024
दरम्यान, हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांचे मीडिया सल्लागार नरेश चौहान यांचे वक्तव्य समोर आले आहे. हा बेकायदेशीर बांधकामाचा मुद्दा आहे, त्याला मशिदीच्या वादाशी जोडू नये, असे त्यांनी म्हटले आहे.
Shimla Mosque । नेमकं काय म्हणाले नरेश चौहान ?
लोकांनी या मुद्द्यावर शांततापूर्ण निदर्शने केली. शांतता कायम राहावी, यासाठी प्रशासन आणि पोलीस आज दिलेल्या आवाहनासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. आम्ही यापूर्वीच कलम 163 लागू केले आहे. मशिदीचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात यावे, अशी हिंदू संघटनांची मागणी आहे. काल मल्याणा येथे दोन समुदायांमध्ये झालेल्या भांडणानंतर हे प्रकरण उफाळून आले होते.
दरम्यन, नुकतेच हिमाचल प्रदेशचे ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री अनिरुद्ध सिंह यांनी मशिदीच्या बांधकामाच्या मुद्द्यावर विधानसभेत जोरदार टीका केली होती. ते म्हणाले होते, ‘संजौली बाजारात महिलांना चालणे कठीण झाले आहे. चोरीच्या घटना घडत आहेत, लव्ह जिहादसारख्या घटना घडत आहेत, ज्या राज्यासाठी आणि देशासाठी घातक आहेत. मशीद बेकायदेशीरपणे बांधण्यात आली आहे. आधी एक मजला बांधण्यात आला, नंतर उर्वरित मजले परवानगीशिवाय बांधण्यात आले. 5 मजली मशीद बांधण्यात आली आहे. मशिदीच्या बेकायदा बांधकामासाठी वीज आणि पाणी का खंडित करण्यात आले नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
ओवेसी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला
हिमाचल प्रदेशचे मंत्री अनिरुद्ध सिंह यांच्या वक्तव्यावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. काँग्रेस भाजपची भाषा बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. ओवेसी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून म्हटले होते की, ‘हिमाचलचे सरकार भाजपचे आहे की काँग्रेसचे? हिमाचलच्या ‘प्रेमाच्या दुकानात’ फक्त द्वेष आहे.’ असं आरोप त्यांनी केला होता.