अयोध्येतील शिलापूजन कार्यक्रम स्थगित -स्वामी स्वरूपानंद सरस्वती

 पुलवामा येथील घटनांमुळे कार्यक्रमात बदल; शिलापूजनाचा नवा मुहूर्त लवकरच जाहीर होण्याची शक्‍यता

अयोध्या – अयोध्येत वादग्रस्त भूमीवर 21 फेब्रुवारी रोजी शिलापूजन कार्यक्रमाची घोषणा केलेले द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर स्वतःचा कार्यक्रम स्थगित केला आहे.
अयोध्या यात्रा आणि शिलापूजन कार्यक्रमामुळे सध्या देशाचे लक्ष विलचित होऊ शकते. आमचा कोणताही कार्यक्रम राष्ट्रहितात अडथळा ठरावा असे आम्ही इच्छित नाही. याच कारणामुळे आम्ही अयोध्या श्रीरामजन्मभूमी रामाग्रह यात्रा आणि शिलापूजनचा कार्यक्रम काही काळासाठी स्थगित करत आहोत. स्थितीनुरूप नवा मुहूर्त काढून आम्ही हा कार्यक्रम भविष्यात पूर्ण करू, असे सरस्वती म्हणाले.

श्रीरामजन्मभूमीच्या संदर्भात आम्ही घेतलेला निर्णय आवश्‍यक आहे. परंतु जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामामध्ये जवानांच्या हौतात्म्यानंतर देशात निर्माण झालेली आकस्मिक स्थिती पाहता आम्ही यात्रा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेत आहोत, असे स्वरूपानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. त्यांच्यावर सध्या वाराणसी येथील सर सुंदरलाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काश्‍मीरमध्ये दहशतवादी कारवायांमुळे देशात युद्धजन्य वातावरण निर्माण झाले आहे. हुतात्मा जवानांचे कुटुंब दुःखी आहेत. देशाचे रक्षण करण्यासाठी बलिदान करणाऱ्य़ा जवानांना आम्ही श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही उभे राहणार आहोत. ही वेळ एकजूट होऊन दहशतवाद्यांच्या विरोधातील लढाईची असल्याचे ते म्हणाले. या मोहिमेसाठी स्वतःच्या घरातून बाहेर पडलेल्या लोकांनी अयोध्येत श्रीरामलल्लाचे दर्शन घेऊन परतावे, असा आमचा निर्देश आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here