“हंगामा-2’चे कलाकार रविवारी चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यासाठी मनालीला रवाना झाले आहेत. “हंगामा-2’मध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा मोठया पडद्यावर वापसी करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्याबाबत तिने इंस्टाग्रामवर अपडेट दिले आहेत.
शिल्पाने एक फोटो शेअर केला आहे. यात ती चित्रपटातील सर्व टीमसह एका खासगी विमानाजवळ पोज देताना दिसत आहेत. यात चित्रपटातील आघाडीचे कलाकार परेश रावल, मीजान आणि प्रणीता सुभाष हे दिसत आहेत. शिल्पाने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “अन् आम्ही निघालो आहे… हीच हंगामा करण्याची वेळ आहे.
हॅशटॅग हंगामा2, हॅशटॅग कन्फ्यूजन अनलिमिटेड, हॅशटॅग शूटमोड, हॅशटॅग सेफ्टीफर्स्ट, हॅशटॅग पावर ऑन, हॅशटॅग बॅक टू वर्क, हॅशटॅग वर्क डायरीज, हॅशटॅग टेक ऑफ.’ दरम्यान, प्रियदर्शनी यांच्या “हंगामा’ या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. हा चित्रपट 2003 साली रिलीज झाला होता.
या चित्रपटात अक्षय खन्ना, आफताब शिवदासनी, रिमी सेन आणि परेश रावल यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने 20 कोटींहून अधिकचा गल्ला जमविला होता.