अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या 1 वर्षाच्या मुलीला करोनाची लागण; पती, सासु-सासरेही पाॅझिटिव्ह

मुंबई – राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बाॅलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनाही करोनाची लागण झाली आहे. त्यातच आता प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या एक वर्षांच्या मुलीसोबत संपुर्ण कुटुंबाला करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम शिल्पाच्या सासु-सासऱ्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर पती आणि दोन्ही मुलांना करोना संसर्ग झाला होता. तिच्या घरातील मोलकरणीलाही करोनाची लागण झाली असून केवळ शिल्पाचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

या सर्वांवर तज्ज्ञ डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घरातच उपचार सुरु आहेत. कुटुंबातील सर्वांना करोना संसर्गाची लागण झाल्याने शिल्पा शेट्टी मानसिक दबावाखाली आहे. शिल्पाने याबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना दिली आहे. तसेच तिने सर्वांना घरातच सुरक्षित राहण्याचा सल्ला दिलाय.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.