शिल्पा शेट्टीचे “हंगामा-2’तून पदार्पण

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही “हंगामा-2′ चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर वापसी करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग लॉकडाऊननंतर पुन्हा सुरू करण्यात आले असून कलाकार सध्या चित्रपटाच्या शीर्षक ट्रॅकच्या शूटमध्ये व्यस्त आहे. 

काही दिवसांपूर्वीच परेश रावल, शिल्पा शेट्टी आणि मिझान जाफरी आणि प्रणिता सुभाषसह कलाकारांनी “पप्पी…’ या गाण्याचे शूटिंग पूर्ण केले आहे. हे गाणे चित्रपटातील फन वाइब असल्याचे मानले जात आहे. या फ्रेममध्ये चार मुख्य कलाकार आणि अन्य डान्सर दिसत आहेत. यात संपूर्ण कास्टने खूपच चांगले काम केले आहे. हा चित्रपट “हंगामा’ फ्रॅचाइजीचा दुसरा भाग आहे. हा चित्रपट 2003मध्ये प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटाच्या सिक्‍वलचे शूटिंग गतवर्षी सुरू करण्यात आले होते. मात्र, देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ते थांबविण्यात आले होते. शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर करत सेटवर परतल्याचे सांगितले होते. दरम्यान, 2003मध्ये प्रदर्शित झालेल्या “हंगामा’मध्ये अक्षय खन्ना, परेश रावल, आफताब शिवदासानी आणि रिमी सेन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. 

शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास ती लवकरच “निकम्मा’ चित्रपटात झळकणार आहे. यात शिल्पासह ज्येष्ठ अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी आणि गायिका शर्ले सेतिया मुख्य भूमिका साकारत आहेत. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.