गेल्या काही दिवसांपासून अभिनेता दिलजीत दोसांज आणि अभिनेत्री यामी गौतम एक नवा कॉमेडी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असे म्हटले जात आहे. आता या चित्रपटात गेल्या 12 वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून लांब असणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची निवड करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अजीज मिर्जा यांचा मुलगा करणार आहे. तसेच या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. शिल्पा शेट्टीने 2007 मध्ये “अपने’ चित्रपटात काम केले होते. त्यानंतर ती पाहूण्या कलकाराच्या भूमिकेत “ओम शांती ओम’ चित्रपटातील टायटल ट्रॅक, दोस्तानामधील “शट आप ऍन्ड बाऊन्स’ गाणे आणि 2014मध्ये प्रदर्शित झालेल्या “तू मेरे टाईप का नही है’ या गाण्यात झळकली होती.
शिल्पा तिच्या आगामी चित्रपटात एका लेखिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या शिल्पा लंडन आणि ग्रीसमध्ये सुट्यांचा आनंद लुटत आहे. परंतु ऑगस्ट महिन्यात ती मुंबईला परतणार असून आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे.