शिल्पा शेट्टीचे स्पेशल करवा चौथ सेलिब्रेशन

बॉलिवूडमधील अभिनेत्री शिल्पा शेट्टी चित्रपट आणि टीव्ही मालिकांशिवाय सोशल मीडियावरही खूप ऍक्‍टिव्ह असते. ती सतत आपल्या चाहत्यांसोबत फोटोज्‌, व्हिडिओ शेअर करत असते. एवढेच नव्हे, तर ती प्रत्येक सण उत्साहाने साजरा करत असते.

यंदाही शिल्पाने करवा चौथसाठी विशेष तयारी केली आहे. याची सुरूवात तिने मेहंदी सेनिमनीने केली आहे. शिल्पाने आपल्या पायांवर सुंदर अशी मेंहदी काढली असून त्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. या फोटोज्‌ला सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने लाईकस्‌ मिळत असून अनेक जणांनी त्यावर कॉमेटस्‌ शेअर केल्या आहेत.

शिल्पाने आपले व्रत चंद्राचा फोटो पाहून सोडले होते. हा फोटो मुंबईतील असून येथे चंद्र न दिसल्याने तिला चंद्राचा फोटो पाहून व्रत सोडावे लागले. दरम्यान, गतवर्षी शिल्पाने श्रीलंका येथे करवा चौथचे सेलिब्रेशन केले होते.

दरम्यान, वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास शिल्पा लवकरच शब्बीर खान यांच्या आगामी “निकम्म’ चित्रपटात झळकणार आहे. ह चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.