ही तर थट्टामस्करीच!!! राज कुंद्राच्या कंपनीतून शिल्पा शेट्टीचा राजीनामा

मुंबई – पॉर्न मूव्हीज प्रकरणात राज कुंद्राला अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा शिल्पा शेट्टीला समन्स बजावणार असल्याचा अंदाज वर्तविला जात होता, पण शिल्पाने राज कुंद्राच्या वियान इंडस्ट्रीजमधून काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. शिल्पा व्यवसायात कुंद्राची भागीदार आहे.

कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी हिचीदेखील पोलिसांकडून चौकशी केली गेली आहे. पोलिसांनी शिल्पाला पोलिस ठाण्यात बोलावले नव्हते, परंतु शुक्रवारी गुन्हे शाखेची एक टीम तिच्या घरी पोहोचली होती. पोलिसांनी यावेळी राज कुंद्रालाही सोबत नेले होते आणि सुमारे 6 तास कुंद्रा आणि शिल्पाला एकत्र बसून चौकशी केली गेली.

शिल्पाला कंपनीकडून किती फायदा झाला याचा गुन्हे शाखा शोध घेत आहे. राज कुंद्राचे ऍडल्ट ऍप हॉटशॉट्‌स आणि त्यातील कटेंटविषयीची पूर्ण माहिती शिल्पाला होती. या ऍपमधून होणाऱ्या कमाईमधील मोठी रक्कम अनेकदा शिल्पाच्या बॅंक खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती.

शिल्पाही आता मुंबई पोलिसांच्या रडारवर आहे. या प्रकरणात शिल्पाचा किती सहभाग आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेची टीम करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सोबतच शिल्पाला कंपनीच्या पैशांचा काही फायदा झाला का, याची चौकशीही गुन्हे शाखेची टीम करीत आहे.

शिल्पाच्या बॅंक खात्यांची चौकशीही गुन्हे शाखेकडून केली जात आहे. या व्यतिरिक्त शिल्पा शेट्टीने ‘वियान इंडस्ट्रीज’च्या डायरेक्‍टर पदावर किती दिवस काम केले याचा शोध घेण्याचा प्रयत्नही गुन्हे शाखा करत आहे. चौकशीसाठी पोलिस पुन्हा शिल्पाशी संपर्क साधू शकतात.

गुन्हे शाखेचे अधिकारी ‘वियान इंडस्ट्रीज’मधील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. ऍप्ससाठी डिजिटल कंटेंट होस्ट करणा-या सर्व्हरमधील डेटा डिलीट करणा-या व्यक्तीचादेखील शोध घेतला जात आहे. राज कुंद्राच्या खात्यात सट्टेबाजीशी संबंधित कंपनीकडून पैसे ट्रान्सफर केले गेले.

फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम डिलीट केलेला डेटा रिस्टोअर करण्याचा देखील प्रयत्न करीत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, सट्टेबाजी करणा-या कंपनीकडून कुंद्राच्या खात्यात मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यात आल्याची माहितीही मिळाली आहे. पॉर्न प्रोजेक्‍टमधून होणा-या कमाईचा उपयोग सट्टेबाजीसाठी करण्यात आला होता की नाही, याचीही चौकशी गुन्हे शाखा करेल.

कुंद्राच्या हॉटशॉट्‌स ऍपवर 20 लाखांहून अधिक सब्सक्राइबर असल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. शिल्पावर राज कुंद्राची चुकीच्या कामाची माहिती लपवल्याचा आरोप आहे. शिल्पा ही त्याची ऍडल्ट कंटेंट कंपनी ‘केनरीन’मध्ये पार्टनर देखील आहे. ब-याच मुलींनी आपल्या निवेदनात सांगितले की, अभिनयात पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांचे शिल्पाशी बोलणे करुन देण्यात आले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.