“शिल्पाला राज कुंद्राच्या अश्लील चित्रपट निर्मितीची पूर्ण माहिती होती” मॉडेलचे गंभीर आरोप

मुंबई – प्रसिद्ध उद्योजक व अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. कुंद्रा याच्या अटकेमुळे चित्रपट सृष्टीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामध्ये शिल्पा शेट्टी हिचा देखील सहभाग आहे काय? असा प्रश्न आता चर्चिला जात आहे.

पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार सध्या सुरु असणाऱ्या तपासामध्ये राज कुंद्राच या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असल्याचं समजतंय. मात्र शिल्पाच्या सहभागाबाबत अद्याप तपास सुरु आहे. अशातच  मॉडेल सागरिका शोना सुमनने अश्लील चित्रपट निर्मितीची शिल्पाला पूर्ण कल्पना असल्याचा धक्कादायक आरोप केलाय.

मॉडल सागरिका शोना हिचे नाव यापूर्वी राज कुंद्राच्या या प्रकरणाशी जोडलं गेलं होतं. मॉडल सागरिकाचा देखील या अश्लील चित्रपटांच्या उद्योगाशी संबंध असल्याचं बोललं जातं आहे. अशातच तिने आता राज कुंद्रा याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीला यासंदर्भात सर्व माहिती होती असा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मॉडल सागरिकाने हा आरोप एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केलाय. 

शिल्पा ही राज कुंद्रांच्या कंपनीमध्ये डायरेक्ट असल्याचा आरोप करत सागरिकाने, “आपल्या कंपनीमध्ये काय सुरु आहे हे एका डायरेक्टरला ठाऊक नाही असं कसं होऊ शकतं?” असा प्रश्न उपस्थित केलाय.

“मी आतापर्यंत यासंदर्भात कुठे वाच्यता केली नव्हती. मात्र आता मुंबई पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलवल्यास मी नक्कीच त्यांची मदत करणार आहे, मला आलेला कॉल हा व्हॉट्सअप कॉल होता. नाहीतर मी तो रेकॉर्ड करुन पुरावा म्हणून पोलिसांना दिला असता,” असंही सागरिकाने म्हटलं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.