मुंबई – पाकिस्तानी कॉन्टेंट क्रिएटर Dananeer हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. तिने शेअर केला व्हिडीओत ती ‘ये में हूं, ये हमारी कार है, और ये हमारी पावरी हो रही है’ असे बोलताना दिसत आहे. तिच्या या व्हिडियोतील पार्टीला पावरी बोलण्याचा अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. फक्त नेटकऱ्यांनीच नाही तर डॉमिनॉज, पीआयबी फॅक्टचेक, झोमॅटोपर्यंत अनेकांनी हे मीम्स शेअर केले आहेत.
View this post on Instagram
यातच तिच्या या बोलण्याचा अंदाजाला बॉलीवूड सेलेब्सनेही आपल्या अंदाजात शेअर केले आहे. Dananeer च्या या व्हिडियोला नुकतेच अभिनेत्री शिल्पा शेट्टीने देखील पावरी हो रही है असे म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
या व्हिडियोमध्ये शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. राजने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो, ‘ये हमारा ब्रेकफास्ट है, ये हमारा व्यू है, और ये हमारी पार्टी हो रही है’ असे बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘पावरी हो रही है’ असे कॅप्शन दिले आहे. राज आणि शिल्पाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.