Shilpa Shetty । बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या चित्रपट आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ती कायदेशीर बाबींमुळे चर्चेत आली आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील सीजेएम कोर्टात शिल्पा शेट्टीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्पासोबत आणखी ४ जणांची नावे यात समाविष्ट करण्यात आली आहेत. अधिवक्ता सुधीर ओझा यांनी शिल्पा आणि इतर ४ जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल केला आहे.
आता या प्रकरणी 11 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. कलम 223,189(7)189(6) 191(1)190,61(1)280,272,198,199(b)(c) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, शिल्फा यांच्यावर ही कारवाई का करण्यात आली याचे कारण मात्र आश्चर्यकारक आहे.
Shilpa Shetty । काय आहे संपूर्ण प्रकरण
मुझफ्फरपूरमधील कलाम बाग चौकाजवळ कल्याण ज्वेलर्सच्या शोरूमचे उद्घाटन होणार होते, जिथे अभिनेत्रीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. शिल्पाच्या आगमनाची माहिती मिळताच तेथे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
Shilpa Shetty । अभिनेत्रीमुळे रस्ता जाम झाला
सुधीर ओझा यांनी सांगितले की,प्रशासनाकडून जाणीवपूर्वक अडवण्यात आले. प्रशासकीय पातळीवर कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या रस्त्यावरून लोकांना ये-जा करावी लागते. कार्यक्रमादरम्यान ट्रॅफिक सिग्नलही बंद ठेवण्यात आल्याने लोकांना अधिक त्रास झाला. ट्रॅफिकमध्ये अडकल्याने अनेकांची महत्त्वाची कामे चुकली. सुधीर ओझा म्हणाले की, ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे त्यांची प्रकृतीही खालावली होती.
Shilpa Shetty । लोकांना समस्यांना सामोरे जावे लागले
शिल्पाची एक झलक पाहण्यासाठी चाहते इतके आतुर झाले होते की शोरूमजवळ ट्रॅफिक जाम झाली. रस्ता पूर्णपणे ठप्प झाला होता. हे पाहून वकिलाने शिल्पा आणि इतर ४ जणांवर गुन्हा दाखल केला. हा खासगी कार्यक्रम असून त्यामुळे अनेक तास रास्ता रोको करण्यात आल्याचे आरोपात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. वाहतूक कोंडीत लोक अडकून राहिल्याने त्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. शिल्पाव्यतिरिक्त उर्वरित चार लोकांमध्ये मुझफ्फरपूरचे जिल्हा अधिकारी सुब्रत कुमार सेन, कल्याण ज्वेलर्स आस्थापनेचे संस्थापक टीएम कल्याण आणि कार्यकारी संचालक रमेश कल्याण यांचा समावेश आहे.
=============