शिल्पा शेट्टी आणि कुटुंबीयांविरोधात फसवणूकीचा गुन्हा

शिल्पा शेट्टी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. शिल्पा, तिची बहिण शमिता आणि आई सुनंदा शेट्टी यांच्याविरोधात एका बिजनेसमनने फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. परहद आमरा असे या बिजनेसमनचे नाव आहे.
शिल्पाचे दिवंगत वडील सुरेंद्र शेट्टी यांनी आपल्याकडून 21 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हे पैसे सुरेंद्र शेट्टी 2017 साली परत करणार होते. मात्र त्यांना ही परतफेड करणे शक्‍य झाले नाही. म्हणून आमराने पोलिसांकडेही तक्रार केली आहे आणि कोर्टातही फसवणूकीचा दावा दाखल केला आहे. जुहू पोलिसही या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र शिल्पा आणि तिच्या कुटुंबीयांच्यावतीने या संदर्भात कोणतेही स्पष्टिकरण देण्यात आलेले नाही.

सध्या शिल्पा एका डान्स कॉम्पिटिशन या रिऍलिटी शो चे जज आहे. तिने हा रिऍलिटी शो आपल्या ग्लॅमरमुळे लोकप्रियदेखील केला आहे. त्याशिवाय शिल्पाने एक हेल्थ ऍप देखील विकसित करणार आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये शिल्पाकडे एक हेल्थ आयकॉन म्हणून बघितले जाते. हेल्थ टिप्स आणि एक्‍सरसाईज व्हिडीओच्या माध्यमातून ती हेल्थ कॉशस पब्लिकला मार्गदर्शन करणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरोग्याविषयी सुदृढपणाविषयी शिल्पा पहिल्यापासूनच जागरुक आहे. तिने यापूर्वी “युट्युब’वर आपले एक चॅनेल देखील लॉंच केले आहे. त्याला मिळालेला प्रतिसादही खूप चांगला आहे. त्यामुळेच एक ऍप डेव्हलप करण्याचा विचार आपल्या मनात आल्याचे तिने सांगितले. हल्ली बऱ्याच सेलिब्रिटीजचे 10 वर्षांपूर्वीचे फोटो आणि आताचे फोटो शेजारी ठेवून “10 इयर चॅलेंज’ बघितले जाते. त्यामध्ये शिल्पाचे 10वर्षांपूर्वीचे फोटो आणि आताचे फोटो बघितले तर तिचा फिटनेस पूर्वीसारखाच असल्याचे लगेच जाणवते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)