शिक्रापूर – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झालेले असून, नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असताना, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी आज शिक्रापूर, सणसवाडी सह परिसरात संचलन करत जनजागृती केली असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिक्रापूर ता. शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव बाबत संचालन काढत नागरिकांना खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे, यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या संचलनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण, महेंद्र शिंदे, दिलीप शिंदे, पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे, पोलीस नाईक विलास आंबेकर, ब्रम्हानंद पोवार, हेमंत इनामे, आप्पासाहेब सूर्यवंशी, प्रताप कांबळे, महिला पोलीस गिता बराटे, किशोर शिवणकर, मयूर कुंभार यांसह तब्बल पस्तीस हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी नागरिकांनी ध्वनी मुद्रिकाद्वारे विनाकारण घराबाहेर पडू नका, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करत त्यांची वाहने देखील जप्त करण्यात येणार आहे, प्रशासनाला सहकार्य करा, आपण आपली काळजी घ्या, दोन व्यक्तींमध्ये चार फुटाचे अंतर ठेवा, हात स्वच्छ धुवा, मास्कचा वापर करा, लहान मुलांना घराबाहेर येऊ देऊ नका, यांसह आदी आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे, तर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर आता पोलिसांचे लक्ष असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. यापुढे नागरिकांनी जास्त खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.