शिक्रापूर (प्रतिनिधी) – करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शिक्रापूर पोलीस व परिसरातील ग्रामपंचायतींनी अंमलबजावणी सुरू केली असून त्यानुसार अनेकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, किरण भालेकर, पोलीस हवालदार संजय ढावरे तसेच सणसवाडीचे ग्रामविकास अधिकारी बाळनाथ पवणे, पोलीस पाटील दत्तात्रय माने, क्रांतिवीर प्रतिष्ठानचे सागर दरेकर यांसह आदींनी सणसवाडी परिसरात तोंडावर मास्क न लावणाऱ्या, रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारला आहे.