लंडन – विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरूध्द सुरू असलेल्या सामन्यात सलामीवीर शिखर धवनने शानदार शतक ठोकल्यामुळे भारताने 33 षटकात 1 बाद 190 धावांची दमदार मजल मारली आहे.
शिखर धवन याने 95 चेडूंत 13 चौकारसह आपले एकदिवसीय कारकिर्दीतील 17 वे शतक पूर्ण केले असून तो अजूनही मैदानावर नाबाद आहे. धवनचे विश्वचषक स्पर्धेतील हे सहावे शतक ठरले आहे.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने धावसंख्येत 200 चा आकडा पार केला आहे. सध्या मैदानात कोहली आणि धवन खेळत आहेत. विराट कोहली हा नाबाद 30*(34) तर धवन हा नाबाद 109*(100) धावांवर खेळत आहे. भारताची धावसंख्या 34 षटकांत 1 बाद 201 झाली आहे.
Gabbar is back 😎
Shikhar Dhawan brings up a brilliant 💯 off 95 deliveries 👏👏 pic.twitter.com/6HkVutZ0Zh
— BCCI (@BCCI) June 9, 2019