नगर, (प्रतिनिधी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ३८ पोलीस अधिकार्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश काढले आहेत.
निवडणूक आयोगाचे आदेशान्वये प्रस्तावित विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस अधिकाऱ्यांचा विधानसभा निवडणूक कामकाजाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध येणार आहे,
अशा पोलीस अधिकारी यांच्या जिल्हयांतर्गत बदल्या तसेच जिल्ह्यात सद्या रिक्त असलेल्या पोलीस ठाणे, शाखा, विभाग येथे अधिकारी नेमणूक करणेबाबत जिल्हा पोलीस आस्थापनाची बैठक पार पडली. त्यानुसार बदल्या करण्यात आल्या.
पोलीस निरीक्षक समाधान चंद्रभान नागरे यांची नियंत्रण कक्षातून शेवगांव पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. दिगंबर हरि भदाणे शेवगावहून घारगाव पोलीस ठाण्यात बदली. तर संतोष बाबुराव खेडकर हे घारगावहून थेट जिल्हा विशेष शाखा, नगर, येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
भगवान हरिभाऊ मथुरे यांची संगमनेर पोलीस ठाण्यातून त्यांची कोपरगाव पोलीस् ठाण्यात बदली करण्यात आली. बापुसाहेब शांताराम महाजन यांची जिल्हा विशेष शाखेतून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बदली झाली.
दौलत शिवराम जाधव हे भरोस सेल ते जिल्हा विशेष शाखा, प्रदिप बाळासाहेब देशमुख यांची कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातून वाहतुक नियंत्रण शाखा, शिर्डी येथे बदली झाली. राजेंद्र जगन्नाथ इंगळे वाहतुक नियंत्रण शाखा, शिर्डी ते ए. एच. टी. यु.नगर, नंदकुमार विष्णु दुधाळ ए. एच. टी. यु.ते वाचक पोलीस ठाणे नगर, मोरेश्वर लक्ष्मण पेंदाम यांची शहर वाहतुक नियंत्रण शाखेतून सायबर पोलीस ठाणे येथे बदली झाली.
बाबासाहेब दगडू बोरसे जिल्हा विशेष शाखा ते शहर वाहतुक नियंत्रण शाखेत बदली झाली. नितीनकुमार सुकदेव चव्हाण यांची वाचक पो नि. पो.अ. कार्यालय, अहमदनगर- ते आर्थिक गुन्हे शाखा, नगर, तर मोहन माणिक बोरसे यांची नियंत्रण कक्षातून अकोले पोलीस ठाण्यात बदली झाली.
किरण बाजीराव शिंदे नियंत्रण कक्षातून श्रीगोंदा पोलीस ठाणे येथे बदलून गेले आहेत. गुलाबराव राजाराम पाटील यांची थेट अकोले येथून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. ज्ञानेश्वर भगवानराव भोसले हे श्रीगोदा येथून नियंत्रण कक्षात आले आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या पुढील प्रमाणे- जगदिश दिपाजीराव मुलगीर पाथर्डी पोलीस ठाणे येथून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात बदलून आले आहेत. तर योगेश जगन्नाथ राजगुरु भिंगार कॅम्प ठाण्यातून नियंत्रण कक्षात बदली झाली. आशिष परसराम शेळके यांची सोनई पोलीस ठाण्यातून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात, तर विजय श्रीकृष्ण माळी कर्जतहून सोनई पोलीस ठाण्यात बदली झाली.
कुणाल सुरेश सपकाळे यांची नियंत्रण कक्ष ते अर्ज शाखा, रमिझ हजरत मुलाणी हे नव्याने ने हजर झाले असून त्यांना कर्जत पोलीस ठाणे देण्यात आले. मंगेश निवृत्ती गोंटला हे जळगाव हून बदलून आले असून त्यांना जामखेड पोलीस ठाणे देण्यात आले.
गणेश लक्ष्मण वारुळे, विवेक अशोक पवार, संदिप अशोक हजारे, कल्पेश आसाराम दाभाडे, यांना पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या पुढील प्रमाण- शुभांगी उत्तमराव मोरे यांची भिंगार कँम्प हून लोणी पोलीस ठाणे येथे करण्यात आली.
योगेश बाबासाहेब शिंदे हे लोणीहून भिंगार पोलीस ठाणे, तुळशिराम रामचंद्र पवार हे नियंत्रण कक्षातून बेलवंडी पोलीस ठाणे, प्रियांका दादासाहेब आठरे ए. एच. टी.यु. नगर ते भरोसा सेल अकार्यकारी पद, निवांत जगजितसिंह जाधव नक्षल सेल नगर ते व्हीआयपी प्रोटोकॉल शनि शिंगणापूर मंदिर अकार्यकारी), उमेश विष्णु पतंगे हे नियंत्रण कक्षातून टीएमसी नगर,
गजेंद्र तुळशिराम इंगळे हे नाशिक ग्रामीण येथून बदली आदेशातील-ते वाचक शाखा, दिपक शेषराव पाठक सध्याचे नेमणुकीचे ठिकाण नाशिक ग्रामीण येथून बदली आदेशाधिन- नविन नेमणुकीचे ठिकाण वाचक, उविपोअ.,
कार्यालय शेवगाव), सतिश अशोक डौले नाशिक ग्रामीण येथुन बदलून आले असून ते वाचक शाखा श्रीरामपुर उपविभाग अकार्यकारी पदात), योगेश पोपट चाहेर हे नाशिक ग्रामीण येथून बदली आदेशाधिन सायबर पोलीस ठाणे (अकार्यकारी पदात) नेमनुक देण्यात आली आहे.
तसेच सहायक पोलीस निरीक्षक विवेक अशोक पवार, नेमनुक वाचक शाखा, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय,नगर यांनी पुढील आदेश होईपावेतो प्रभारी अधिकारी, दहशतवार विरोधी शाखा, नगर या पदाचा अतिरीक्त कार्यभार पहावा.
तसेच पोलीस उपनिरीक्षक उमेश विष्णु पतंगे, नेमनुक टीएमसी, नगर यांनी प्र. अधिकारी बीडीडीएस या पदाचा अतिरीक्त कार्यभार देण्यात आला आहे. महेश वामनराव शिंदे, यांच्याकडे प्रभारी अधिकारी, नक्षल सेलचा अतिरीक्त कार्यभार देण्यात आला आहे. उपरोक्त सर्व पोलीस अधिकारी यांनी तात्काळ बदली केलेल्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहेत.