आवर्तनाबरोबरच शेटफळ तलावही भरणार

बावडा – नीरा डावा कालव्याचे आवर्तन इंदापूर तालुक्‍यात पूर्ण क्षमतेने आणून 59 ते 36 फाट्यापर्यंतचे सर्व आवर्तन अल्पावधीत पूर्ण करून शेटफळ तलाव भरून घेतला जाईल, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

इंदापूर तालुक्‍यातील शेवटचा फाटा लाखेवाडी 59 ते 36 सणसरपर्यंत मागेल, त्या सर्व शेतकऱ्यांना तातडीने आवर्तन देऊन शेटफळ तलावात पाणी सोडण्यासंदर्भात पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे व कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांच्याशी पाटील यांनी (दि. 20) दूरध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेनुसार वरीलप्रमाणे तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. शेटफळ तलाव हा गेल्या वर्षी कोरडा पडला आहे.

त्यामुळे नऊ गावांमध्ये पाण्याअभावी परिस्थिती गंभीर बनलेली आहे. त्यामुळे नीरा डावा कालव्यातून शेटफळ तलावात पाणी सोडल्यास पिण्याच्या पाण्याच्या व जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्‍नांची तीव्रता कमी होऊन शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळणार आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली.र्षवर्धन पाटील.

Leave A Reply

Your email address will not be published.