शेखर गोरेंचा राष्ट्रवादीला पहिला दणका

माण पंचायत समिती सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश

गोंदवले – माण खटावचे युवा नेते शेखर गोरे यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माण खटाव विधानसभा मतदारसंघात पहिला फटका राष्ट्रवादी कॉग्रेसला बसला असून शेखरभाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली माण पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसकडून निवडून आलेले पंचात समितीच्या मलवडी गणातील विजयकुमार मगर व आंधळी गणातील सौ. कविता विवेक जगदाळे यांनी शेखरभाऊ गोरेंच्या नेतृत्वाला साथ देत राष्ट्रवादीचे घडयाळ काढून ठेवत हातात शिवबंधन बांधत भगवा झेंडा घेऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश घेऊन शेखरगोरे यांनी राष्ट्रवादीला पहिला दणका दिला आहे.

जिल्हा परिषदेचा आंधळी गट 2009 पासून लोकप्रतिनीधींचा बालेकिल्ला होता. याच बालेकिल्ल्यावरून त्यांनी मतदारसंघाचे राजकारण चालवले होते. आंधळी गट व दोन्ही गण कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेणारच असा निर्धार शेखर गोरे यांनी केला होता. तो त्यांनी यशस्वी करून दाखवत आपल्या नेतृत्वाखाली आंधळी गटातून बाबासहेब पवार तर मलवडी गणातून विजयकुमार मगर, आंधळी गणातून सौ. कविता जगदाळे यांना बहुमतांनी निवडून आणले होते.

राष्ट्रवादी सोडल्यानंतर माझ्याबरोबर एकही पदाधिकारी जाणार नाही असे म्हणणाऱ्यांना ही चपराक आहे. मतदारसंघात अजून अनेक भगवी वादळे येणार आहेत…ये तो शुरूआत है ,आगे आगे देखो होता है क्‍या…!

– शेखरभाऊ गोरे (युवा नेते, शिवसेना)

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×