गोंदवले – शेखर गोरे यांच्या माध्यमातून शिवसेनेला एक चांगला शिवसैनिक मिळाला असून त्यांच्या माध्यमातून माण तालुक्यात शिवसेना आणखी भक्कम होणार आहे, असे प्रतिपादन शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी केले. माण विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे माजी नेते शेखर गोरे यांनी गुरुवारी सायंकाळी मुंबई येते मातोश्रीवर उध्दव ठाकरे आणि नितीन बानुगडे पाटील यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी माजी आमदार दगडू दादा सपकाळ, सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, महाराष्ट्र रंग कामगार सेना अध्यक्ष धनाजी सावंत, जिल्हा उपप्रमुख संजय भोसले, शंकर वीरकर, बाळासाहेब मुलाणी, गणेश सत्रे, राजेंद्र जाधव, सुनील जाधव, वैभव मोरे, शरद पवार, तेजस पवार, दत्ता घाडगे, विरकुमार गांधी गजानन धडाबे, राहुल गोरे, पंढरीनाथ जाधव, प्रकाश महाडिक, दीपक पाटोळे, राजू इंगळे, राजू झगडे, संतोष देशमुख, विक्रांत देशमुख, दादा शिनगारे, राजू गायकवाड, नितीन घाडगे, राहुल जगदाळे, दादा मडके, सचिन कदम, अतुल पवार यांच्यासह माण तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यासह शिवसेनेत जाहीर प्रवेश करत हातात भगवा घेतला आहे.