शीला दीक्षित यांच्यावर होणार आज अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं शनिवारी निधन झालं. शनिवारी दुपारच्या सुमारास एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्‍यानं त्यांचं निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या हृदयसंबंधित आजाराविरोधात झुंज देत होत्या. त्याच्या निधनामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

शनिवारी संध्याकाळी 6 वाजता त्यांचे पार्थिव निजामुद्दीन येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधींपर्यंत अनेक नेत्यांनी शीला दीक्षित यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने येथे दोन दिवसांचा राजकीय शोक घोषित केला आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी याबाबतची घोषणा केली. रविवारी दुपारी 12.15 ते 1.30 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी कॉंग्रेस कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. यानंतर निगमबोध घाटावर त्यांचे पार्थिव नेण्यात येईल, येथे दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास अंतिम संस्कार करण्यात येतील.

Leave A Reply

Your email address will not be published.