नवी दिल्ली- दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या ‘शीला दीक्षित’ यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शीला दीक्षित गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने फोर्टीस एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
Former PM Manmohan Singh: I’m shocked to hear the sudden passing away of Smt #ShielaDixit. In her death the country has lost a dedicated Congress leader of the masses. People of Delhi will always remember her contribution to Delhi’s development during her tenure as CM for 3 terms pic.twitter.com/O7b2Byg8sl
— ANI (@ANI) July 20, 2019
त्यांच्या निधनानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. “शीलाजींच्या निधनाची बातमी ऐकून मला आश्चर्या वाटले. दिल्लीच्या विकासदरम्यान ते 3 वेळा मुख्यमंत्री म्हणून दिसले. त्यांचे योगदान दिल्लीच्या नागरिकांच्या कायमच स्मरणात राहिल”. असं त्यांनी म्हंटल आहे.